Breaking News

सिद्धार्थ करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र पोलीस भरती २०२६ मध्ये घवघवीत यश : N7 News Voice

सिद्धार्थ करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र पोलीस भरती २०२६ मध्ये घवघवीत यश; पाच विद्यार्थ्यांची निवड

निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह मान्यवर 

N7 News Voice

नागपूर: महाराष्ट्र पोलीस भरती २०२६ चा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये नागपूरच्या सिद्धार्थ करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. अकॅडमीच्या पाच विद्यार्थ्यांनी पोलीस दलात स्थान मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अश्विनी मोहकरशालिनी गायकवाड,राहुल काकडे,जयदीप शेंडेतुषार भालावी  या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे: विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सिद्धार्थ करिअर अकॅडमीतर्फे एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी अकॅडमीच्या संचालिका राजश्री गुप्ता   सुषमा रंगारी  यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सेंटर हेड प्रशांत मानके  यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करताना सांगितले की, "अकॅडमीचा उद्देश जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सरकारी सेवेत संधी मिळवून देणे हा आहे आणि भविष्यातही आम्ही हा संकल्प सुरू ठेवू." अकॅडमिक हेड प्रीतीश मेश्राम  यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले: "हे यश विद्यार्थ्यांचे सातत्य, कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाचे फळ आहे. पोलीस दलात सेवा करतानाही हाच प्रामाणिकपणा टिकवून ठेवावा." सिद्धार्थ करिअर अकॅडमीने नेहमीच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे काम केले आहे. अकॅडमीच्या अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम यामुळेच हे यश शक्य झाले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना सरकारी सेवेत स्थान मिळवून देण्यासाठी अकॅडमी प्रयत्नशील राहील, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.


Resounding Success for Siddharth Career Academy Students in the 2026 Maharashtra Police Recruitment; Five Students Selected

N7 News Voice

Nagpur: The results for the 2026 Maharashtra Police Recruitment have been declared, and students from Nagpur's Siddharth Career Academy have hoisted the flag of success in this endeavor.

Five students from the academy have secured positions within the police force, thereby adding a feather to the institution's cap of honor. Ashwini Mohkar, Shalini Gaikwad, Rahul Kakade, Jaideep Shende, and Tushar Bhalavi are the students who have achieved this remarkable success. To celebrate this achievement, Siddharth Career Academy organized a special felicitation ceremony. During the event, the successful students were honored with bouquets and mementos. On this occasion, the academy's Directors, Rajashree Gupta and Sushma Rangari, congratulated the students and extended their best wishes for their future endeavors.

Applauding the students' hard work, Center Head Prashant Manke stated, "The academy's objective is to help as many students as possible secure opportunities in government service, and we will continue to uphold this commitment in the future." Academic Head Pritish Meshram offered valuable guidance to the students during the event. He remarked, "This success is the fruit of the students' consistency, hard work, and self-confidence. You must maintain this same level of integrity and sincerity while serving in the police force." Siddharth Career Academy has consistently played a pivotal role in guiding students in the field of competitive examinations. During the ceremony, it was emphasized that this success was made possible through the expert guidance of the academy's experienced faculty combined with the diligent efforts put forth by the students. The management expressed its confidence that the academy would continue to strive to help an increasing number of students secure positions in government service in the years to come.

 

No comments